मुंबई फायर ब्रिगेड नव्या रुपात

February 23, 2010 11:25 AM0 commentsViews: 12

उदय जाधव23 फेब्रुवारीमुंबई फायर ब्रिगेड ही देशातील सर्वात जुनी फायर ब्रिगेड कात टाकत आहे. कोणत्याही परिस्थितीशी मुकाबला करू शकणारे हायटेक युनिफॉर्म जवानांना देण्यात येणार आहेत.कारण गेली 130 वर्षे फायर ब्रिगेडच्या जवानांच्या युनिफॉर्ममध्ये बदल झालेला नाही. फायर ब्रिगेडच्या 2 हजार 320 जवानांना हा हायटेक युनिफॉर्म देण्यात येणार आहे. एका युनिफॉर्मची किंमत आहे एक तब्बल 1 लाख रुपये. 1947नंतर आग विझवताना 21 जवानांचा मृत्यू झाला आहे. हा नवीन हायटेक युनिफॉर्म जवानांना सुरक्षित ठेवेल, असा दावा फायर ब्रिगेडचे अधिकारी करत आहेत.

close