कल्याणचा छोटा सचिन !, 83 चौकार, 30 षटकार आणि 652 धावांचा विक्रम

January 4, 2016 9:12 PM0 commentsViews:

kalyan_prnav_dhankavde04 जानेवारी : क्रिकेटच्या जगतात सतत नवे नवे विक्रम घडत असतात आणि जुने विक्रम मोडले जात असतात यावेळी प्रथमच क्रिकेटच्या जगतात असणारा जागतिक विक्रम मोडण्याचा मान कल्याण शहराच्या वाट्याला आला आहे. येथील प्रणव धनावडे या क्रिकेटपटूने चक्क एका दिवसात 652 धावांचा विक्रम रचलाय.

1891 साली 628 धावांचा विक्रम प्रणव धनावडे याने मोडीत काढलाय. हा विक्रम प्रणव याने 199 चेंडूमध्ये 83 चौकार आणि 30 षटकार मारून नोंदविला आहे, प्रणव हा कल्याण येथील के.सी.गांधी शाळेचा विद्यार्थी आहे. दरवर्षी एमसीए मुंबई तर्फे 16 वर्ष वयाखालील विद्यार्थ्यांचे आंतरशालेय सामने घेतले जातात. कल्याणमध्ये हे सामने युनियन क्रिकेट क्लबच्या मैदानात खेळले जात असून यामध्ये एकूण ठाणे जिल्हा आणि परिसरातील 38 शाळांमधील संघांनी यामध्ये भाग घेतला होता.

कल्याणमध्ये नव्या सचिन तेंडुलकरचा उदय

- आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत घडला नवा विक्रम
– प्रणव धनावडेने ठोकल्या नाबाद 652 धावा
– एकाच दिवसात काढल्या 652 धावा
– केवळ 199 चेंडूत 652 धावाचा विक्रम
– 83 चौकार, 30 षटकारांची केली लटलूट
– एच टी भंडारी ट्राफीमध्ये नोंदवला विक्रम

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close