ए.बी. वर्धन अनंतात विलीन

January 4, 2016 9:37 PM0 commentsViews:

04 जानेवारी : सीपीआयचे ज्येष्ठ नेते ए.बी.बर्धन यांच्यावर आज (सोमवारी) दिल्लीच्या निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 92 वर्षांच्या वर्धन यांचे शनिवारी प्रदीर्घ आजाराने दिल्लीत निधन झालं. आज सकाळी त्यांचे पार्थिव पक्षाचे मुख्यालय असलेल्या अजाँय भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. या वेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, अर्थमंत्री अरुण जेटली, कम्युनिस्ट नेते सिताराम येंचुरी, प्रकाश करात, शरद यादव दिल्लीचे उप राज्यपाल नजीब जंग यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. वर्धन यांच्या पश्चात एक मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे. जास्त काळ सीपीआयचे महासचिव राहण्याचा मान वर्धन यांना मिळाला होता. तसंच दोन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व सुद्धा केलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close