बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची सरकारची तयारी

February 23, 2010 11:29 AM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारीबीडीडी चाळींचा पुनर्विकास होण्याची आशा आता निर्माण झाली आहे. राज्यसरकारने त्यादृष्टीने पावले उचलली आहेत. या चाळीच्या रहिवाशांची एक बैठक सरकारने घेतली. यावेळी त्यांची पुनर्विकासाबाबत काय मते आहेत. ती जाणून घेण्यात आली.93 एकर जागामुंबईच्या मध्यावर असलेल्या 93 एकर जमिनीवर शिवडी, वरळी, ना.म. जोशी मार्ग आणि नायगाव या भागात 1924मध्ये 207 बीडीडी चाळी उभारण्यात आल्या. यात जवळपास 16 हजार 213 भाडेकरु राहतात. तर 332 दुकानेही आहेत.येथील रहिवाशांनी या चाळींच्या पुनर्वसनाची सरकारकडे मागणी केली आहे. सरकारने या मागणीची दखल घेतल्याचे सध्या तरी दिसत आहे. आता पुनर्वसनासाठी सरकार काय पावले उचलते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close