मीरा भाईंदर पालिकेचं नवीन मुख्यालयच बेकायदा भूखंडावर

January 4, 2016 11:03 PM0 commentsViews:

mira bhindar 23404 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मीरा भाईंदरमध्ये महापालिकेच्या मुख्यालयाचं उद्घाटन झालं. पण मीरा भाईंदर महापालिकेच्या भूखंडच बेकायदा असल्याचं स्पष्ट झालंय. ठाण्याच्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी या बांधकामाला तातडीने स्थगिती देऊन चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताधारी भाजपच्या गोटात खळबळ उडालीय आणि यामुळे स्थानिक भाजप नेत्यांसह महापालिकेचे प्रशासकीय अधिकारीही यामुळे अडचणीत आले आहे.

या भूखंडावर एका बिल्डरला बांधकामासाठी परवानगी देण्यात आली. आणि त्या मोबदल्यात मिळालेल्या भूखंडावर मीरा भाईंदर महापालिकेचं मुख्यालय मोफत उभारून घेतलं जातंय. मात्र, शिवाजी माळी यांच्या तक्रारीनुसार तहसीलदार कार्यालयाने केलेल्या प्राथमिक तपासणीत हा भलामोठा भूखंड खासगी नव्हे, तर चक्क सरकारी मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर जिल्हाधिकारी जोशी यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू करून मुख्यालयाच्या बांधकामाला तातडीने स्थगिती देण्याचे आदेश दिले. सालासार युनिक ग्रुप या शहरातल्या बडया बिल्डरने या जागेवर निवासी-व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या शहर विकास विभागाकडे दाखल केला. या आराखड्याला मंजुरी देताना याच जागेत महापालिकेचं मुख्यालय मोफत उभारून द्यायचं, असा प्रस्वात महापालिकेने ठेवला. मीरा-भाईंदर नगरीला स्मार्ट करण्याच्या दृष्टीने हे दमदार पाऊल आम्ही उचललंय असा गाजावाजा भाजपच्या नेत्यांनी केला. आणि या भूमिपूजनासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना पाचारण केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close