आमदार प्रणिती शिंदेंसह 31 जणांवर गुन्हा दाखल

January 5, 2016 1:28 PM0 commentsViews:

Praniti shinde

05 जानेवारी : प्रशासनाचा मनाई आदेश धुडकावून आपत्कालीन रस्त्यावर मंडपाचा खांब रोवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, महापौर सुशीला आबोटे यांच्यासह 31 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर यात्रेचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूर इथे सिद्धेश्वर यात्रेचा वाद सुरू आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आराखडय़ाला सिद्धेश्वर देवस्थानचा विरोध आहे. या आराखडय़ानुसार आपत्कालीन मार्गावर मंडप उभारण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यावरून सोलापूरचे वातावरण तापले असून, या आराखडय़ाला आमदार शिंदे यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. प्रशासनाचा मनाई आदेश झुगारून लावत शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सोलापूरकर जनतेने सोमवारी आपत्कालीन रस्त्यावर मंडपाचा खांब रोवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

याची गंभीर दखल घेत आमदार शिंदे यांच्यासह 31 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सिद्धेश्वरची गड्डा यात्रा तोंडावर येऊन ठेपली असताना प्रशासन आणि मंदिर समितीतला वाद वाढत चालल्याने यात्रेच्या दिवशी नेमकं काय होणार याकडे भक्तांचं लक्षं लागलं आहे

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close