चिमूरमध्ये नरभक्षक वाघाची दहशत

February 23, 2010 11:55 AM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारीचंद्रपूरजवळ चिमूरमध्ये वाघाचे हल्ले वाढले आहेत. या वाघाला वनविभागाने लवकरात लवकर जेरबंद करावे या मागणीसाठी गावकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. सिंदेवाही तालुक्यातील शिवणी वनक्षेत्रात या वाघाने गेल्या पंधरा दिवसांत 5 जणांचे बळी घेतले आहेत. त्यामुळे सध्या इथे दहशतीचे सावट आहे. पण या हल्ल्यांबाबत वनविभाग गंभीर नसल्याचा आरोप गावककरी करत आहेत. गावकर्‍यांचा संतापवाघाच्या हल्ल्यांनी त्रस्त झालेल्या गावकर्‍यांनी वनविभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली आणि पोलिसांना घेराव घातला. यानंतर आता वन विभागाने या हल्लेखोर वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पिंजरे आणि शार्प शूटर्स वाघ पकडण्यासाठी वनविभागाने 4 पिंजरे लावले आहेत. तसेच जामासाडा नाल्यावर 4 शार्प शूटर्स तैनात करण्यात आले आहेत.दोन वर्षांपूर्वीही वाघाने इथे 7 लोकांचे बळी घेतले होते. गोंडपिंपरीतही 3 लोकांचे बळी गेले होते. पण तेंव्हाही वनविभागाला वाघाला पकडण्यात यश आले नव्हते. यावेळी तरी वनविभागाच्या मोहिमेला यश येतेय का याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.

close