‘धुळवडीत रेनडान्स नको’

February 23, 2010 12:04 PM0 commentsViews: 3

23 फेब्रुवारीहोळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी 'रेनडान्स' करु नये असे आवाहन मुंबई महापालिकेनेकेले आहे. धुलीवंदनाच्या दिवशी जवळपास 5 हजार सोसायट्यांकडून टँकरची मागणी केली जाते. आणि या पाण्याचा वापर होतो, रंग उडवण्यासाठी आणि भिजण्यासाठी! सध्या मुंबईत पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे वाया जाणारे पाणी वाचवा, असे आवाहन महापालिकेने केले आहे. यासोबतच या दिवशी टँकर लॉबीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येत्या दोन दिवसात बैठक घेतली जाणार असल्याचेमहापौरांनी सांगितले आहे.

close