पठाणकोटबद्दल दिलेला शब्द पाळा, अमेरिकेनं पाकला सुनावलं

January 5, 2016 4:55 PM0 commentsViews:

usa_on_pak05 जानेवारी : पठाणकोट हल्ल्याबाबत आता अमेरिकेनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहे. हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू, असं पाकनं म्हटलंय, आणि ते आपला शब्द पाळतील, अशी आम्हाला आशा आहे, अशा शब्दात अमेरिकेनं नाराजी व्यक्त कर पाकला सुनावलंय.

पठाणकोट हल्ल्यात सहा दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं. हे सहाही दहशतवादी पाकिस्तानातून आले आहे. एवढंच नाहीतर चकमकी दरम्यान दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील आपल्या सूत्रधाराशी चार वेळा संपर्क साधला होता. याचा पुरावा भारताच्या हाती लागला.  भारताने हे पुरावे पाकला देणार आहे. भारताने दिलेले पुरावे आणि माहितीवर आम्ही काम करतोय, अशी भूमिका पाकने घेतली. पाकमधली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा या हल्ल्यात हात असल्याचा भारताला दाट संशय आहे. आता जैशवर पाक काय कारवाई करतं, ते पाहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close