खूप चांगली कामगिरी केली, सचिनने थोपाटली प्रणवची पाठ

January 5, 2016 5:21 PM0 commentsViews:

sachin_on_prnav05 जानेवारी : कल्याणचा प्रणव धनावडे याने तब्बल 1 हजार धावांचा विश्वविक्रम केलाय. त्याच्या या यशाचं विक्रमादित्य,मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केलंय. खूप चांगली कामगिरी केलीये. आणखी मेहनत करं तू यशाची उंच शिखरं गाठशील असं कौतुक सचिनने केलंय.

आंतर शालेय 16 वर्षांखाली क्रिकेट स्पर्धेत प्रणवने आज नाबाद 1009 धावा ठोकल्या आहे. एकाच सामन्यात 1000 धावा करण्याचा भीम पराक्रम त्याने गाजवलाय. साहजिकच या पराक्रमाची सोनेरी अक्षरांनी नोंद झालीये. त्यांच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतं आहे. विक्रामादित्य सचिन तेंडुलकरने ट्विट करुन प्रणवची पाठ थोपाटलीये. आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत 1 हजार रन्स केल्याबद्दल प्रणव धनावडेचं अभिनंदन. खूप चांगली कामगिरी केलीस. आता आणखी मेहनत करं. तू यशाची उंच शिखरं गाठशील अशा शुभेच्छा सचिन तेंडुलकरने दिलाय. तर  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रणवला फोन करून कौतुक केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close