पठाणकोट हल्ल्याबाबत मोदी-शरीफ यांच्यात चर्चा, कारवाईचं दिलं आश्वासन -पर्रिकर

January 5, 2016 5:39 PM0 commentsViews:

parikar_pc05 जानेवारी : पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली असून शरीफ यांनी तपासात पूर्ण सहकार्याचं आश्वासन दिलंय अशी माहिती संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिली.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी पठाणकोटला भेट दिली. त्यांच्याबरोबर लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह सुहाग आणि हवाईदल प्रमुख चीफ मार्शल अरूप राहा संरक्षणमंत्र्यांसोबत होते. पाहणी केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी मीडियाला संबोधित केलं.

पठाणकोटच्या कारवाईत 6 दहशतवादी ठार झाले असून 7 जवान शहीद झाल्याची माहिती दिली. तसंच शहिदांच्या कुटुंबीयांना 25 लाखाची मदत त्यांनी जाहीर केली. सर्व मृतदेहांची DNA चाचणी होणार आहे. पठाणकोटची कारवाई 28 तास सुरू राहिली आणि आता कोंम्बिंग ऑपरेशन सुरू असून ते उद्यापर्यंत चालणार असल्याचे त्यांनी म्हटलंय.

या कारवाईत सुरक्षा दलांने चांगली कामगिरी केल्याचं पर्रिकर म्हणाले. पण या हल्ल्याच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेतल्या काही त्रुटी समोर आल्याचं त्यांनी सांगितलं. या त्रुटींमध्ये आपण लक्ष घालणार असल्यांचे त्यांनी स्पष्ट केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close