प्रदूषण तपासा अॅपच्या मदतीने…

January 5, 2016 6:48 PM0 commentsViews:

help_chat_app05 जानेवारी : दिल्ली पाठोपाठ मुंबईतही प्रदूषणाचे जोरदार वारे वाहताना दिसत आहेत. विश्वास बसत नाही ना…!! मग तुम्हीच बघा तुमच्या आजूबाजूच्या परिसरात किती प्रमाणात प्रदूषण आहे ते..तेही एका अॅपच्या मदतीने.

आता तुम्ही एका अॅपच्या मदतीने तुमच्या जवळपासचं प्रदूषण मोजू शकणार आहात. ‘हेल्प चॅट’ असं या अॅपचं नाव असून या अॅपने नुकताच प्रदूषण मोजण्याचा पर्याय अॅड केला आहे. हे अॅप तुम्हाला हवेचा क्वालिटी इन्डेक्स दाखवतो. जर तुमच्या परिसरातील हवेचा क्वालिटी इन्डेक्स कमी अर्थात 0 च्या जवळपास असेल तर तुमच्या इथली हवा शुद्ध आहे. आणि जर तुमच्या इथल्या हवेचा क्वालिटी इन्डेक्स जास्त असेल तर अर्थातच तुमच्या इथली हवा प्रदुषित झालेली आहे. त्यामुळे तुमचा जीव प्रदूषणाच्या वाढत्या प्रमाणामुळे धोक्यात तर नाही ना हे नक्की तपासून बघा…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

close