पुणे स्टेशनला जागतिक दर्जा कधी?

February 23, 2010 12:33 PM0 commentsViews: 5

नितीन चौधरी 23 फेब्रुवारीपुणे रेल्वे स्टेशनला जागतिक दर्जा देऊ असे 3 वर्षांपूर्वी रेल्वे बजेटमध्ये घोषित करण्यात आले होते. पण ही घोषणा अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीची अपुरी साधने असा त्रास सहन करणार्‍या पुणेकरांना या वर्षीच्या रेल्वे बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.खरे तर मुंबईनंतर पुणे राज्यातील मोठे शहर आहे. पण रेल्वेच्या बाबतीत मात्र तसे नाही. फक्त 6 प्लॅटफॉर्म्स आणि जवळपास 190 ट्रेन्सच्या रोजच्या फेर्‍या. लोकलआहे, पण फक्त लोणावळ्यापर्यंतच…आणि तीही 1 तासाच्या अंतराने!पुण्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन स्टेशनच्या इमारतीला आंतरराष्ट्रीय दर्जाचे रुप देण्याचे ठरले होते. पण काही जुजबी बदल करून ते काम आता थांबले आहे. तर आंतरराष्ट्रीय रुप मिळाले नसले तरी या 5 वर्षांच्या काळात पुण्याला भरपूर निधी मिळाला, असे रेल्वेचे म्हणणे आहे.पुण्यात वाढणारे औद्योगिकीकरण, वाढते ट्रॅफिक आणि मुंबईशी असलेली जवळीक पाहता पुण्याकडे अधिक लक्ष द्या, अशी मागणी प्रवासी संघटना करत आहेत.

close