माओवाद्यांनी अपहरण केलेले तिन्ही तरुण गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन

January 5, 2016 8:08 PM0 commentsViews:

gadchiroli4305 जानेवारी : माओवाद्यांनी अपहरण केलेल्या पुण्यातल्या 3 तरुणांना गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. पुण्यामधले हे तीन तरुण छत्तीसगडमधल्या सुखमा जिल्ह्यात शांतीचा संदेश घेऊन गेले होते. माओवाद्यांनी  या तरुणांचं अपहरण करून  4 दिवसानंतर त्यांना सोडलं होतं. या तरुणांना गडचिरोली पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आलं.

पोलिसांचं हे पथक त्यांना घेऊन गडचिरोलीला परतलंय. विकास वाळके, आदर्श पाटील आणि श्रीकृष्ण खेवले अशी या तरुणांची नावं आहेत. बस्तरमधल्या जनतेशी संवाद साधण्यासाठी हे विद्यार्थी सायकलवरून बस्तरला गेले होते. 29 डिसेंबरला सुकमा जिल्ह्यातून जगरगुंडा भागात अपहरण करण्यात आलं होतं. या मुलांची सुटका होईपर्यंत  दक्षिण बस्तरमध्ये नक्षलविरोधी अभियान थांबवण्याचा महत्त्वाचा निर्णय बस्तर पोलिसांनी घेतला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close