मुंबईतही सम-विषम गाड्यांचा प्रयोग करावा, सेनेची मागणी

January 5, 2016 9:02 PM0 commentsViews:

mumbai_oad_even_sena05 जानेवारी : राज्यातील पर्यावरण अबाधित राखण्यासाठी दिल्ली प्रमाणेच मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये (एमएमआरडीए) दिल्लीप्रमाणे सम-विषम वाहनांचा प्रयोग करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे  केली आहे. मात्र,टोलवाल्यांची यामुळे वसुली कमी होणार असल्याने त्यांचा विरोध होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर विकास होत असल्याने लोकसंख्या वाढीबरोबर वाहनाची संख्याही वाढत आहे. दिल्ली सारखीच परिस्थिती मुंबईची बनली आहे. वाहतूक कोंडीमुळे दोन-अडीच तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ध्वनी आणि वायूप्रदुषणाबरोबरच इंधनाचीही नासाडी होते. सध्या दिल्लीमध्ये सम-विषम वाहनांचा प्रयोग 15 दिवसांपुरता सुरू केला असून दोन दिवसांतच प्रदूषणाची पातळी निम्म्यावर आल्याची नोंद आहे. तेव्हा,राज्यात असा प्रयोग केला तर भविष्यात वाहन चालकांना शिस्त लागेल, प्रदूषण कमी होईल, अपघातांच्या प्रमाणात घट होईल आणि इच्छीतस्थळी वेळेवर पोहचता येईल असा दावा सरनाईक यांनी केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या धर्तीवर एमएमआरडीए क्षेत्रामध्ये सम-विषम वाहनांचा प्रयोग राबवावा अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.या बाबत राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते काय भूमिका घेतात या वरून भविष्यात सेनेत वाद निर्माण होऊ शकतो.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close