राष्ट्रपतींच्या गावचे स्टेशन दुर्लक्षित

February 23, 2010 12:46 PM0 commentsViews: 5

प्रवीण मनोहर23 फेब्रुवारीअमरावती जिल्ह्यातील नरखेडा रेल्वे स्टेशनची दुरवस्था झाली आहे. 1992-93मध्ये या स्टेशनची घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात त्याचे बर्‍यापैकी काम झाले. पण आज या स्टेशनवरची बहुतेक साहित्य चोरीला गेले आहे. शिवाय स्टेशनची मोडतोडही झाली आहे. अमरावती-नरखेड मार्गावरील हे नया अमरावती नावाचे सुसज्ज असे रेल्वे स्टेशन सध्या निर्मनुष्य आहे. या स्टेशनसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. पण सुरक्षेअभावी सिग्नल यंत्रणा, इलेक्ट्रिक सामान, पंखे, तसेच स्वीच रुममधले साहित्य चोरी गेले आहे.हाकेच्याच अंतरावर असलेल्या उपमुख्य अभियंत्याचे कार्यालय मात्र चोरीची जबाबदारी घ्यायला तयार नाही. तिकीटघर, स्टेशन मास्तरांची केबीन, वेगवेगळ्या विभागाची दालने इथे तयार आहेत. पण सध्या त्याला कुणीही वाली नाही. खरे तर अमरावती हे राष्ट्रपतींचे गाव. त्यामुळे आता तरी या स्टेशनकडे दुर्लक्ष करू नये, अशी अपेक्षा येथील प्रवाशी करत आहेत.

close