औरंगाबादेत 19 जणांनी बदलली आपली ओळख, लिंगबदलाची ऑपरेशन्स यशस्वी

January 5, 2016 10:36 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद

05 जानेवारी : निसर्गाची लीला अपरंपार असं आपण नेहमी म्हणतो…कारण निसर्गाचे काही काही चमत्कार आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे असतात. म्हणून आपण नेहमीच म्हणतो निसर्गावर व्रूिाानाच्या ताकतीच्या आधारे आपल्याला नियंत्रण मिळवणे आतापर्यंत शक्य झाले नाही. असेच प्रकार औरंगाबादेतील एका रूग्णालयात समोर आले आहे. बहुतेक हे प्रकार आपल्या आजूबाजूला आहेत. मात्र ते आपल्याला माहीत नाहीत कारण लोक या बद्दल बोलण्यास तयार नाहीत..निसर्गाच्या चमत्काराविषयी हा विशेष रिपोर्ट…

aurangabad_newsऔरंगाबादच्या रामकृष्ण रूग्णालयात आलेल्या या दोन माता…आणि त्यांची दोन गोंडस बालकं..निसर्गाच्या चमत्कारामुळे पुरते मानसिक धक्क्यातून सावरलेत…एक माता आहे शंकरची… शंकर आधी होता गौरी कारण शंकरला आधी मुलगी समजून तीच्या आईनं त्याला मुलीच्या वेषात वाढवला. मात्र काळानुसार शंकर मुलगी नसून मुलगा असल्याचं दिसू लागलं. कारण त्याला मुलींची काम…मुलीचे
कपडे..आणि मुलींमध्ये राहाण्यात रस नव्हता…मात्र त्याचे लिंग मुलीसारखे होते. त्याच्या आईनं डॉ.संदीप हंबर्डे यांच्याकडं आणलं.
डॉक्टरांना शंकर मुलगी नसून मुलगा असल्याचं आढळलं.

मृदुलाच्या आईनं मृदुलाला मुलगा म्हणून वाढवलं..त्याचं नावही विनोद ठेवलंं..पण काही दिवसांनी मृदुला ही मुलगा नसून मुलगी आहे हे  जाणवायला लागलं. पण मृदृलाचं लिंग मुलासारखेच होते. काही दिवसांनी विनोद मुली सारखी वागू लागली. तिला मुलींसोबतच राहायला ..मुलींसारखी काम करायला आवडायला लागलं. विनोदच्या आईने त्याला डॉक्टरकडे आणलं आणि विनोद मुलगी असल्याचं सिद्ध झालं.मात्र मुलाचा मुलगी झाल्याचं अनेकांना समजलं आणि त्यानंतर त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला.

गौरीचा शंकर झाला आणि मृदुलाचा विनोद झाला..हा केवळ व्रूिाानाचा चमत्कार आहे. यात कोणत्याही प्रकारचं पाप, पुण्य अशा भ्रामक कल्पनांचा संबंध नाही, हेच डॉ. हंबर्डेही सांगतात.

आजही या वैज्ञानिक डिस ऑर्डरमुळे अनेकांना आपण मुलगा आहोत की मुलगी हे सिद्ध करता येत नाही. अनेक जण सामाजिक बदनामीमुळे प्रकरण लपवून ठेवतात. अनेकदा समजूत घालून केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून अशी अनेक ऑपरेशन डॉ.हंबर्डे यांनी विनाशुल्क केलीत. हा कोणताही आजार नाही त्यामुळे ज्यांची ऑपरेशन झालीत ते आपलं नैसर्गिक आयुष्य चांगलं जगतायेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close