शेतकरी दाम्पत्याचा करुण अंत, पतीच्या आत्महत्येच्या धक्क्याने पत्नीचाही मृत्यू

January 5, 2016 10:47 PM0 commentsViews:

osmanbad_news205 जानेवारी : उस्मानाबाद जिल्ह्यात मन पिळून टाकणारी घटना घडली आहे..सततची नापिकी आणि कर्ज बाजरीपणाला कंटाळून नवऱ्याने गळफास घेतला हे पाहून पत्नीनेही आपला जीव सोडला आहे. कळंब तालुक्यातील कनेहरवाडी गावात ही घटना घडली.

आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव बालाजी मिटकरी आहे. केवळ 3 एकर एवढी शेती असून ही शेती वडिलांच्या नावावर होती पण करता पुरुष म्हणून बालाजी ही शेती पाहत होता. पण. सततच्या नापिकीमुळे शेतात कसले ही उत्पादन निघाले नाही. त्यात बँकचे कर्ज या मुळे बालाजी सतत चिंताग्रस्त झाले होते. आज नवरा बायको शेतात गेले असता मी विहिरीवरून पाणी पिऊन येतो असे सांगून बालाजी निघून गेले आणि पलीकडील शेतात जाऊन गळफास घेतला. बराच वेळ झाला नवरा कसा आला नाही. हे पाहण्यास गेलेल्या बायकोने आपल्या नवऱ्याचे प्रेत फाशी घेतलेल्या अवस्थेत पाहून ती जागेवरच कोसळली. तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृतघोषित  केलं. या शेतकरी दाम्पत्याच्या पश्चात 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. वडिलाबरोबर आईच्या जाणणे ही लेकरे अनाथ झाल्याने गावासह जिल्ह्यात सगळीकडेच हळहळ व्यक्त होत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close