सीरिज खिशात टाकण्यासाठी सज्ज

February 23, 2010 1:18 PM0 commentsViews: 5

23 फेब्रुवारीभारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची दुसरी वन डे उद्या ग्वाल्हेरमध्ये रंगणार आहे. ही वन डे जिंकत सीरिज खिशात टाकण्यासाठी धोणीची टीम इंडिया सज्ज झाली आहे. तर पराभवाचा वचपा काढण्याचा निर्धार आफ्रिकेच्या टीमने केल आहे. या वन डेसाठी आफ्रिकन टीममध्ये हाशिम अमलाला संधी मिळण्याची शक्यता आहे.पहिली वन-डे भारताने जरी जिंकली असली तरी टीममधील कमकुवत बाजू मॅचमध्ये प्रकर्षाने जाणवल्या. आता दुसर्‍या वन डेत या चुका टाळण्यासाठी धोणीला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. खेळपट्टी बॅटींगसाठी पोषक ग्वाल्हेरची खेळपट्टी ही बॅटींगसाठी पोषक असल्याने भारतीय बॅट्समनवर मोठी जबाबदारी असणार आहे. पहिल्या मॅचमध्ये मिडल ऑर्डरमध्ये मोठमोठ्या पार्टनरशिप झाल्या होत्या. त्याच्या जोरावर भारताने तीनशेचा टप्पा गाठला होता. पण सचिन तेंडुलकरला मोठी खेळी करता आली नव्हती. दुसर्‍या वन-डेत मात्र वीरू-सचिनकडून चांगली ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे.वचपा काढण्यासाठी सज्जदुसरीकडे अवघ्या एका रनने पराभव पत्करावा लागलेली कॅलिसची टीमही आफ्रिकन स्पिरीटप्रमाणे दुसर्‍या वन-डेत त्वेषाने खेळेल हे नक्की. त्यातच टेस्टमध्ये कमाल कामगिरी करणार्‍या हाशिम आमलालाही दुसर्‍या मॅचमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे टीमची बॅटींग लाईन-अप अजूनच भक्कम होईल.बॉलर्सची कामगिरीही महत्त्वाची अशावेळी भारतीय बॉलर्सची कामगिरीही महत्त्वाची ठरणार आहे. त्यातच 2011च्या वर्ल्ड कपला आता फक्त एकच वर्ष उरले आहे. त्या दृष्टीने टीम उभारण्याचे ध्येयही भारतीय निवड समितीसमोर आहे. त्यामुळे दुसर्‍या वन-डेत कोणाला संधी मिळते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

close