धक्कादायक ! एक महिन्याच्या चिमुकलीला आईनंच चुलीत जाळलं

January 6, 2016 1:05 PM0 commentsViews:

Parathwada21321

06 जानेवारी : पहिली मुलगी असताना दुसर्‍यांदाही मुलगीच झाल्याने जन्मदात्या आईनेच पोटच्या मुलीला जाळून टाकल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. पोलीस चौकशीत चिमुकलीची आईच तिची मारेकरी असल्याचं स्पष्ट झाल्याने पोलिसांनी त्या मुलीच्या आईला अटक केली.

निकिता वाकोडे, असं या अरोपी महिलेचं नाव आहे. निकिता हिच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यातच पहिली मुलगी असताना दुसर्‍यांदाही मुलगी झाल्याने दोन्ही मुलींचा सांभाळ कसा करायचा, अशी चिंता निकिताला सतावत होती. त्यातूनच तिने अवघ्या एक महिन्याच्या या चिमुरडलीला घरातील चुलीत जाळून मारले. त्यानंतर कुंभीनजवळच्या विच्छेन नदीपात्रातालगत एका बॉक्समध्ये तिचा मृतदेह टाकून दिला.

दरम्यान, ग्रामस्थांना चिमुरडीचा जळालेला मृतदेह आढळल्याने त्यांनी तातडीने याबाबत परतवाडा पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून निकिताला अटक केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close