वाढत्या हिंसाचारामुळे बराक ओबामांना रडू कोसळलं

January 6, 2016 11:24 AM0 commentsViews:

CYBKtVmWEAAITnP

06 जानेवारी : अमेरिकेतील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांवर बोलत असताना आज (मंगळवारी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना अश्रूअनावर झाले. अमेरिकेत गेल्या काही वर्षात झालेल्या गोळीबारामध्ये तब्बल 10 हजारहून जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याविषयी ओबामांनी चिंता व्यक्त केली आहे

अमेरिकेत काही दिवसांपूर्वी बेछूट गोळीबारात काही लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या आठवणीने व्यथित झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हळवे झाले. मी प्रत्येकवेळी जेव्हा त्या मुलांचा विचार करतो तेव्हा मला त्या विचाराने वेडे व्हायला होते, असे सांगताना ओबामांच्या चेहर्‍यावरून अश्रू ओघळत होते.

अमेरिकेमधील अनेक घरांमध्ये परवाना असलेल्या बंदुका आहेत. या कार्यक्रमात ओबामांनी अमेरिकेतील शस्त्रांच्या सहज उपलब्धतेविषयी चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना, सर्वसामान्य नागरिकांना सहजपणे उपलब्ध होणारी शस्त्रे रोखण्याची गरज असल्याचं मतही ओबामांनी व्यक्त केलं आहे. त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सहकार्य घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वीअमेरिकेला पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही ओबामांनी अमेरिकन जनतेला दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close