बंगळुरूमधील आगीत 9 दगावले

February 23, 2010 2:57 PM0 commentsViews: 1

23 फेब्रुवारीबंगळुरूमधील कार्लटन टॉवरला लागलेल्या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्या एअरपोर्ट रोडवर हे व्यावसायिक संकुल आहे. तिथे दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास 6व्या आणि 7व्या मजल्यावर आग लागली. आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. काही मिनिटांतच आग आटोक्यात आणण्यात त्यांना यशही आले. पण आगीमुळे बिल्डिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता. या धुरामुळे गुदमरून बर्‍याच जणांचा मृत्यू झाला. तर काहींचा आगीपासून सुटका करण्यासाठी टॉवरवरून उड्या मारण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला. जखमींवर मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आगीत 60 जण जखमी झालेत. त्यापैकी 12 जखमींची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी चौकशीचे आदेश मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिले आहेत.

close