एमसीएकडून प्रणव धनावडेला शिष्यवृत्ती जाहीर

January 6, 2016 6:25 PM0 commentsViews:

cricket002.JPG06 जानेवारी : विक्रमवीर प्रणव धनावडेच्या मदतीसाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशननंही पुढाकार घेतलाय. प्रणवला पाच वर्षं महिना 10 हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा एमसीएनं केलीये. 2016 ते 2021 पर्यंत प्रणवला एमसीएकडून ही शिष्यवृत्ती मिळेल. त्यासोबत प्रणवच्या क्रिकेट आणि शाळेच्या प्रगतीवरही एमसीए लक्ष ठेवून असेल. त्यासाठी लागणारी मदतही एमसीए करणार आहे असं एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं. प्रणव धनावडेनं तब्बल 1009 धावा ठोकत विश्वविक्रम रचलाय. त्याच्या या विजयाबद्दल शरद पवार यांनी अभिनंदन केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close