IBN लोकमतचा दणका, बदलापूरचा स्कायवॉक एका दिवसात चकाचक

January 6, 2016 6:35 PM0 commentsViews:

badlapur_imp06 जानेवारी : बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या स्कायवॉकवर जाहिरात ठेकेदारांनी भंगार सामान ठेवले होते. त्यामुळे या स्कयावॉकचं रुपांतर डंपिगं ग्राऊंडमध्ये झालं होतं. आयबीएन लोकमतने सर्वात प्रथम ही बातमी दाखवली होती आणि आता फक्त एका दिवसांच्या आत हा स्कायवॉक स्वच्छ करण्यात आला आहे.

ठेकेदारांने या स्कायवॉकचा वापर हा जुने बोर्ड, डसबीनचे लोखंडी गंजलेले डब्बे तसंच जाहिराती लावण्यासाठी वापराव्या लागणार्‍या
शिड्या ठेवल्याने प्रवाशांना ये-जा करतांना अडचण होत होती. या संबंधीची बातमी आयबीएन लोकमतने लाऊन धरत त्याचा पाठपुरावा केला होता. अखेर अवघ्या एकच दिवसात हे भंगार ठेकेदाराने उचलल्याने हे ठिकाण चकाचक झाले.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close