शनि शिंगणापूरच्या विश्‍वस्तपदी पहिल्यांदाच महिलांची वर्णी

January 6, 2016 6:55 PM0 commentsViews:

Shani-Shingnapur-925615528s06 जानेवारी : शनि शिंगणापूरमध्ये मंदिराच्या चौथर्‍यावर चढून महिलेनं दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखेर आता शनि शिंगणापूरच्या इतिहासात एक क्रांतीकारी घटना घडली आहे. शनि शिंगणापूरच्या विश्वस्पपदी 2 महिलांची नियुक्ती झाली आहे. 11 सदस्यांच्या विश्वस्तमंडळात 11 पैकी 2 महिला असणार आहे. विश्वस्तपदाच्या निवडणुकीसाठी आले होते 98 अर्ज आले होते. सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी यादीही जाहीर केली.
गेली कित्येक दशक शनी शिगणापूरमध्ये महिलांनी प्रवेश करू नये अशी प्रथा आहे. पण, या प्रथेला छेद देत एका तरुणीने थेट चौथर्‍यावर चढून दर्शन घेतलं. पुरोगामी म्हणवणार्‍या या महाराष्ट्रात याचे पडसाद काही वेगळेच उमटले. त्यामुळे महिलांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती.  त्यामुळे अशा प्रथांना कायमचा धडा शिकवण्यासाठी काही महिला पुढे आल्यात. शिंगणापूरच्या चार ते पाच महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून 2 महिलांची विश्वस्तपदी निवड झालीये.

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close