गोरक्षकांचा पर्दाफाश, कसायालाच विकले पोलिसांच्या ताब्यातले बैल

January 6, 2016 8:54 PM1 commentViews:

अनिल तिळगुळकर, कोल्हापूर

06 जानेवारी : जिथे स्वार्थ असतो तिथे सगळं मागे पडतं, कोल्हापुरात सहा जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी विकायला जाणारे बैल पोलिसांना पकडून दिले आणि त्यातले बैल चोरुन ते कसायाला विकले. मुक्या बैलांचा यात जीव गेलाच पण गोरक्षणचा खोटा आव आणणार्‍यांचा चेहराही उघडा झाला.

kolhapur_pkg_newwsपोलिसांच्या ताब्यात असलेले हेच ते सहा आरोपी ज्यांनी नाट्यमयरित्या 4 बैल चोरले आणि त्याची कत्तल केली. सावंतवाडीहुन बैल
कत्तलीसाठी बेळगावला नेले जात असल्याची टीप या सगळ्यांना मिळाली होती. त्यांनी पोलिसांच्या मदतीने विकायला जाणारे 25 बैल पकडले. हे बैल पोलिसांनी गोशाळेत ठेवले होते. या सहा पैकी तिघांनी पोलिसांच्या ताब्यातील बैलांपैकी 4 बैलांची चोरी केली आणि बेळगावमधील कसायांना कापण्यासाठी ते विकले.

आधी स्वतःच पोलिसांना खबर करायची, गोरक्षणाचा आवा आणायचा आणि नंतर त्यांच्याच ताब्यातले बैल पळवण्याचं कारस्थान या आरोपींनी केलं. तेही स्वतःच्या स्वार्थासाठी…यातले तिघे हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत हे अधिक गंभीर आहे.

धर्माच्या नावाखाली गोरक्षणाचा आव आणून स्वार्थ साधायचा आणि त्यात संघटनेच्या नावाचा वापर करायचा अशीही वृत्ती बाळगणारे भामटे या प्रकरणातून समोर आलेत. वेळीच त्यांच्यावर कारवाई होऊन अशा वृत्तीला अळा बसणं गरजेचं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Narendra Patil

    गर्वसे कहो हम हिंदू है .

close