मराठवाड्यातील रेल्वे पूल धोकादायक

February 23, 2010 3:36 PM0 commentsViews: 12

माधव सावरगावे23 फेब्रुवारीरेल्वे बजेटमधून काहीच न मिळाल्याने गेली काही वर्षे मराठवाड्याच्या पदरी निराशा येत आहे. निधीची तरतूद होत नसल्याने अनेक कामे रखडलेली आहेत. डागडुजी न झाल्याने मराठवाड्यातील अनेक ट्रॅक धोकादायक बनले आहेत. आणि जवळपास 600 किलोमीटरदरम्यानचे 170 रेल्वे पूल कधीही ढासळू शकतात, अशा अवस्थेत आहेत.केंद्राचे दुर्लक्ष आणि नांदेड विभागातील अधिकार्‍यांची मनमानी यामुळे रेल्वेची ही दुरवस्था झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.औरंगाबाद ते मनमाड दरम्यान जवळपास 124 लहानमोठे पूल आहेत. तर मराठवाड्यामध्ये त्याची संख्या 400 च्या घरात जाते. त्यापैकी जवळपास 170 पूल सध्या धोकादायक अवस्थेत आहेत. या पुलांची पडझड झाली आहेत. अनेक ठिकाणी आधार देणारे कठडे गायब झाले आहेत. परभणी जिल्ह्यातील सोनपेठजवळील पुलावरून तर रेल्वेला आपला वेग ताशी 30 किलोमीटर एवढा कमी करावा लागतो. आता या रेल्वे बजेटमध्ये नवे नको पण निदान जुन्याकडे तरी पाहा, असे म्हणण्याची वेळ मराठवाड्यातील प्रवाशांवर आली आहे.

close