सनातनच्या धमकीला घाबरत नाही -सबनीसांचं प्रत्युत्तर

January 6, 2016 10:30 PM0 commentsViews:

shripal_sabanis06 जानेवारी : सनातनचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी मला मॉर्निंग वॉकला जाण्याचा दिलेला सल्ला एकाप्रकारे ही मला गंभीर धमकीच आहे. पण या धमकीमुळे मी घाबरलो नाही असं सांगत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांचे डोळे पाणावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर एकेरी भाषेत टीका केलामुळे प्रसिद्धीझोतात आलेले अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आता सनातनच्या रडारवर आले की काय असा संशय बळावलाय. सबनीस, तुम्ही मॉनिर्ंग वॉकला जात चला, अशी धमकी सनातनचे कायदेशीर सल्लागार संजीव पुनाळेकर यांनी दिलीय. पुनाळेकर यांनी 3 जानेवारी रोजी हे ट्विट केलं होतं. या ट्विटद्वारे सनातनने सबनीस यांना थेट धमकी दिलीय. याआधी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या ते मॉर्निंग वॉकला गेलेले असतानाच झाली होती. या पार्श्वभूमीवर ही धमकी म्हणजे सबनीस यांना थेट हल्ल्याची धमकी आहे. मात्र, सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी हा दावा फेटाळून लावलाय. पुनाळेकर यांनी केलेलं ट्विट हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याचा सनातन संस्थेशी काहीही संबंध नाही. सनातनला जर एखाद्या विषयावर भाष्य करायचं असेल तर आम्ही जाहीर पत्रकार परिषदेतून तशी भूमिका मांडतो अशी पाठराखण वर्तक यांनी केली. पण, दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा अभ्यास केला असता त्यांची हत्या याच वेळी झालेय. त्यामुळे ही मला धमकीच आहे. असा दावा सबनीस यांनी केला. मात्र, हे सांगत असतांना सबनीस यांना अश्रू आवरता आले नाही. माझ्या डोळ्यात अश्रू आले म्हणजे मी घाबरलो नाही असं प्रत्युत्तरही सबनीस यांनी पुनाळेकरांना दिलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close