26/11चा खटला अंतिम टप्प्यात

February 23, 2010 3:44 PM0 commentsViews: 4

23 फेब्रुवारी26/11 अकराचा खटला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या खटल्याच्या अंतिम युक्तीवादाला 9 मार्चपासून सुरूवात होणार आहे. हा खटला लांबवण्याचा बचाव पक्षाचा प्रयत्न हाणून पाडल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. दरम्यान मुंबई हल्ल्यातील आरोपी सबाउद्दीनच्या वकिलांची मागणी स्पेशल कोर्टाने फेटाळली आहे. गुजरातचे डीजीपी, NIA चे संचालक, डेव्हिड हेडलीचा ट्रेनर विलास वरक आणि महेश भट यांचा मुलगा राहुल भट या चौघांना साक्षीदार म्हणून कोर्टात हजर करावे, अशी मागणी नक्वी यांनी सोमवारी केली होती. त्यावर कोर्टाने आज निर्णय दिला. या स्फोटातील आणखी एक आरोपी फहीम अन्सारी याचा जामीन अर्ज कोर्टाने काल फेटाळला होता. दरम्यान आणखी एक आरोपी फहीम अन्सारी याचे वकील शाहिद आझमी यांचा खून झाल्याने आता फहीमचे वकीलपत्र त्याचा भाऊ खालीद आझमी याने स्वीकारले आहे. यात खालीदसोबत आणखी एक वकील असतील.

close