‘गजेंद्र चौहान वापस जाओ’; FTIIच्या विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी

January 7, 2016 10:15 AM0 commentsViews:

ftii student3434

07 जानेवारी : फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया अर्थात एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी येणाऱया अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या विरोधात विद्याथच् पुन्हा आक्रमक झाले आहेत. एफटीआयआयच्या प्रवेशद्वारासमोर मोठया संख्येने जमलेल्या विद्यार्थ्यांनी ‘गजेंद्र चौहान वापस जाओ’, अशी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना ताब्यात घ्यायला सुरूवात केल्याने या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

पोलिसांनी बजावलेल्या नोटीसला न जुमता विद्यार्थी आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे एफटीआयआयचे प्रशासन चौहान यांच्या स्वागतसाठी ढोल-ताशासह एफटीआयआयच्या आवारात सज्ज झाले असतानाच दुसरीकडे चौहान यांच्या विरोधासाठी मोठय़ा संख्येने घोषणाबाजी करणार्‍या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येत असल्याने एफटीआयआय परिसरात प्रचंड तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी अनेक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. अजुनही काही विद्यार्थी घोषणाबाजी करत आहेत. विद्यार्थ्यांचा प्रखर विरोध पाहता चौहान यांना एफटीआयआयमध्ये प्रवेश मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

गजेंद्र चौहान यांची निवड रद्द करण्यासाठी तब्बल 139 दिवस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्याचबरोबर बॉलीवूडमधील अनेक दिग्गल कलाकारांनी या आंदोलनाला पाठिंबा देत चौहान यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही पुण्यात येऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. तसंच चौहान यांची निवड रद्द करण्यासाठी दिल्लीच्या जंतर मंतरवरही आंदोलन करण्यात आलं होतं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close