मुंबईत ‘सम-विषम’ लागू करा; शिवसेनेची मागणी, भाजपचा विरोध

January 7, 2016 8:16 AM0 commentsViews:

उदय जाधव, मुंबई

07 जानेवारी : राजधानी दिल्ली प्रमाणेच MMRDA क्षेत्रासाठी सम विषम प्रयोग सुरू करण्याची मागणी, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलीय. मुख्यमंत्री आणि परिवहनमंत्र्यांनी हा प्रयोग मुंबईसाठी फायदेशीर नसल्याचं संगितलंय. पण सत्ताधारी शिवसनेच्याच आमदारांनी सम विषमची मागणी केल्यामुळे युतीत विषमता निर्माण झालीय.

sadjsiaj

सम-विषम नंबरप्लेट संख्येच्या गाड्यांना एक दिवसाआड वाहतूक करण्याची परवानगी, हा प्रयोग सध्या दिल्लीत चांगलाच गाजतोय. असाच प्रयोग मुंबईसह संपुर्ण MMRDA क्षेत्रासाठी करावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सत्ताधारी शिवसेनेच्याच आमदारांनी अशी मागणी केल्यावर भाजपची डोकेदुखी वाढलीय. त्यातच परीवहनमंत्री शिवसेनेचेच असल्याने भाजपवर कुरघोडी करण्याची चांगलीच संधी चालून आलीय अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. पण परीवहनमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची बाजू घेत, ‘सम-विषम’ प्रयोग मुंबईसाठी योग्य नसल्याचं सांगितलं आहे.

मुंबईकरांची मात्र या ‘सम-विषम’ प्रयोगाला संमिश्र प्रतिक्रीया आहेत. ट्रॅफीक जॅमने मुंबईकरही त्रस्त आहेत. पण त्यावर उपाय म्हणून जे पर्याय शोधले जात आहेत. ते आणखी काही समस्या निर्माण करू नयेत हीच अपेक्षा.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close