‘क्वांटिको’मधल्या भूमिकेसाठी प्रियांकाला ‘पीपल्स चॉईस अॅवॉर्ड’

January 7, 2016 2:00 PM0 commentsViews:

priyankachopra-peoplechoiceaward7596

07 जानेवारी : बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने 2016 चा पीपल्स चॉईस ऍवॉर्ड पटकावला आहे. प्रियांकाला ‘क्वांटिको’ या सीरियलमधल्या भूमिकेसाठी नामांकन मिळालं होतं. प्रेक्षकांनी केलेल्या मतदानाच्या आधारावर प्रियांकाची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. प्रियांकाने ट्विट करून याबद्दलची माहिती दिलीये.

या सीरियलमध्ये प्रियांका ‘एफबीआय’ एजंटची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सीरियलमध्ये काम करणारी आणि पीपल्स चॉईस ऍवॉर्ड मिळवणारी ती पहिली बॉलीवूड अभिनेत्री ठरली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

 
Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close