‘स्फोटाचा तपास अंतिम टप्प्यात’

February 23, 2010 3:57 PM0 commentsViews: 2

23 फेब्रुवारीपुणे इथे जर्मन बेकरीच्या स्फोटाचा तपाय एटीएस करत आहे. या संबंधी संशयित लोकांना ताब्यात घेण्यात आले, असून स्फोटाचा तपास अंतिम टप्प्यात असल्याची माहिती राज्याचे गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी दिली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते. 'अभिनव भारतचा संबंध नाही'जर्मन बेकरीतील स्फोटाशी अभिनव भारत या संघटनेचा संबंध नाही, असे संघटनेच्या अध्यक्ष हिमानी सावरकर यांनी स्पष्ट केले आहे. स्फोटातील तपासाचे अपयश लपवण्यासाठी अभिनव भारतकडे बोट दाखवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या बॉम्बस्फोटामागे काही हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्या पार्श्वभूमीवर, अभिनव भारतने आपली बाजू मांडली आहे.दरम्यान स्फोटात अभिनव भारत संघटनेच्या सहभागाबाबत विचारले असता, आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत असे पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी म्हटले आहे

close