ब्रँड अॅम्बॅसेडर नसलो तरी देश अतुल्यच राहणार -आमिर खान

January 7, 2016 5:26 PM0 commentsViews:

amir khan_bollywood07 जानेवारी : पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ या जाहिरातीतून अभिनेता आमिर खानला वगळण्यात आलंय. अतुल्य भारताच्या
ब्रँड ऍम्बेसेडरपदावरुन आमिरला हटवण्यात आलंय. आमिरनेही मोठ्या मनाने सरकारचा निर्णय मान्य केलाय. गेली दहा वर्षं आपण यासाठी मोफत काम केलंय आणि पुढेही अशी संधी मिळाली तर मी सदैव उपलब्ध असेल. मी जरी ब्रँड ऍम्बेसेडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार असं मत आमिरने व्यक्त केलं. आमिरने या प्रकरणावर एक निवेदन प्रसिद्ध केलंय.

आमिर खानचं निवेदन

‘अतुल्य भारत’ मोहीमेचा मी गेली दहा वर्षं ब्रँड ऍम्बॅसेडर होतो, हा मी माझा सन्मान समजतो. देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली याचा मला निश्चितच आनंद आहे, आणि अशा कार्यासाठी मी सदैव उपलब्ध असेन. अशा प्रकारच्या माहितीपटांसाठी मी नेहमी मोफत काम करत आलेलो आहे, हे मी स्पष्ट करतो. एखाद्या मोहिमेसाठी ब्रँड ऍम्बॅसेडर असावा की नाही, असल्यास कोण असावा हे ठरवण्याचा हक्क सरकारचा आहे. त्यामुळे ब्रँड ऍम्बॅसेडर पदावरुन मला हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मी आदर करतो. देशासाठी जे सर्वोत्तम असेल, त्याचदृष्टीने पुढची पावलं उचलली जातील अशी मला खात्री आहे. मी ब्रँड ऍम्बॅसेडर नसलो तरी आपला देश हा अतुल्यच राहणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close