अमिताभ बच्चन ‘अतुल्य भारत’चे नवे अॅम्बेसेडर

January 7, 2016 6:37 PM0 commentsViews:

amithabh_bachan_Incredible_India07 जानेवारी : गेली दहा वर्ष अतुल्य भारताचा नारा देणारा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आता या जाहिरातीत दिसणार नाही. त्यामुळे आता आमिरच्या जागी बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन अतिथी देवो भवचा नारा देणार आहे. अमिताभ बच्चन यांची ब्रँड ऍम्बेसेडरपदी निवड करण्यात आलीये. पर्यटन मंत्रालयाकडून अमिताभ बच्चन यांच्या नावाला हिरवा कंदील दिलाय. प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांचीही नाव चर्चेत होती. अखेर बिग बीच आता अतुल्य भारतचं दर्शन घडवणार आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या ‘अतुल्य भारत’ अभियानसाठी आमिर खानने गेली दहा वर्ष ब्रँड ऍम्बेसेडरपद भूषवलं. अतिथी देवो भव : असा संदेश देत अनेक जाहिरातींमध्ये आमिर झळकला. या अभियनासाठी पर्यटन मंत्रालयाने मैकन वर्ल्डवाईड या जाहिरात संस्थेसोबत करार केला होता. या संस्थेनं अतुल्य भारत जाहिरातीसाठी आमिर खानची निवड केली होती. या संस्थेसोबतचा करार आता संपला आहे. त्यामुळे आपोआप आमिर आता ब्रँड ऍम्बेसेडर नाही अशी माहिती पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी दिली.

काल बुधवारी आमिर खानला या पदावरुन हटवण्यात आली घोषणा करण्यात आली. पण, काही वेळानंतर पर्यटन मंत्रालयाने यू-टर्न घेत आमिर खानला हटवण्यात आलं नाही असं जाहीर केलं होतं. आता आमिर खान ‘अतुल भारत’ अभियानाचा ब्रँड अम्बेसेडर नसणार हे पर्यटन मंत्र्यांनी स्पष्ट केलंय. पर्यटन मंत्रालयाने नव्या ब्रँड ऍम्बेसेडरचा शोध सुरू केला.

यासाठी शाहरुख खान, अमिताभ बच्चन यांच्या नावाची चर्चा झालीये. तसंच पर्यटन क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वाचा असल्यानं महिला ब्रँड ऍम्बॅसेडरपदासाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांची नावं चर्चेत होती. पण अखेरीस पर्यटन मंत्रालयाने अमिताभ बच्चन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close