हेच का अच्छे दिन ?, शेतकर्‍यांच्या मदतीत 4 हजारांपर्यंत कपात

January 7, 2016 9:06 PM0 commentsViews:

state_gov_gr07 जानेवारी : अस्मानी संकटाने हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यास सरकारने आधीच उशीर केला आणि त्यातचं आता सरकारनं मिळणार्‍या मदतीमध्ये 2 हजार ते 4 हजारांपर्यंत कपात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई कमी होणार आहे.

महसूल विभागाने नवा जीआर जारी केला आहे. या जीआरमध्ये शेतकर्‍यांवर कुर्‍हाड पडल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता कोरडवाहू शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 3 हजार 200 रुपये कमी मदत मिळणार आहे. तर बागायती शेतकरी आणि फळबागा शेतकर्‍यांचीही मदत कमी करण्यात आली आहे. आघाडी सरकारच्या काळात शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 10 हजार रुपये मदत दिली गेली आहे. पण फडणवीस सरकारने मदतीच्या रक्कमेत कपात केली असून ही रक्कम 6 हजार 800 वर आणून ठेवलीये. तर बागायती शेतकर्‍याला आघाडी सरकारच्या काळात प्रति हेक्टर 15 हजार मदत मिळायची ती आताच्या सरकारने प्रति हेक्टर 13 हजार 500 रुपये केली आहे. तर फळबाग शेतकर्‍यांना आघाडी सरकारच्या काळात प्रति हेक्टरी 25 हजार मदत दिली गेली आहे. आणि आता हीच मदत प्रति हेक्टरी 18 हजार रुपये करण्यात आलीये. जवळपास शेतकर्‍यांना 2 ते 4 हजारांचा फटका सहन करावा लागणार आहे. ‘अच्छे दिन’चं स्वप्न दाखवणार्‍या सरकारचा दावा फौल ठरला असून आघाडी सरकारचं बरं होतं अशी म्हणण्याची वेळ आलीये.

शेतकर्‍यांच्या मदतीवर कुर्‍हाड

कोरडवाहू शेतकरी
आघाडी सरकार – प्रति हेक्टरी 10,000 रु.
युती सरकार – प्रति हेक्टर 6,800 रु.

बागायती शेतकरी
आघाडी सरकार – प्रति हेक्टर 15,000 रु.
युती सरकार – प्रति हेक्टर 13,500 रु.

फळबाग शेतकरी
आघाडी सरकार – प्रतिहेक्टरी 25,000 रु.
युती सरकार – प्रति हेक्टरी 18,000 रु.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close