चक्क पाण्याचं एटीएम मशीन

January 7, 2016 9:44 PM0 commentsViews:

07 जानेवारी: एटीएम म्हटलं की, आपसूकच पैसे काढण्याचं मशीन आपल्या डोळ्यांसमोर येतं. हे पैशांचं मशीन आपण नेहमीच पाहतो आणि हाताळतोही. परंतु मालेगाव तालुक्यातील एका गावाने चक्क पाण्याचं एटीएम मशीन सुरू केलंय.

मालेगाव तालुक्यातील टेहरे ग्रामपंचायतीनं एक पाण्याचं एटीएम मशीन आणून बसवलं आहे. नागरिकांच्या आरोग्यासाठी हे शुद्ध पाण्याचं एटीएम बसवायचा निर्णय ग्रामपंचायतीकडूनच घेण्यात आला. टेहेरे या गावाला बारागाव पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 10 ते 12 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. पण हा पाणी पुरवठा अशुद्ध असल्याने गावकर्‍यांना आरोग्याच्या विविध समस्यानाही सामोरं जावं लागत होतं. या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचे हे एटीएम सुरू केलं.

पाण्याच्या या एटीएम अंतर्गत, आता येथील गावकर्‍यांना पाच रुपयांच्या अत्यल्प किंमतीत दररोज आर.ओ.चे वीस लिटर शुद्ध पाणी मिळतंय. विशेष म्हणजे ग्रामपंचायत कुठलेही शासकीय अनुदान न घेता स्वखर्चातुन ही योजना अमलात आणली आहे. या कौतुकास्पद उपक्रमामुळे गावकर्‍यांना पाण्याचे महत्व कळण्याबरोबरच पाण्याचीही बचत होणार आहे.+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close