महिलांवरही ‘ममता’

February 24, 2010 9:18 AM0 commentsViews: 2

24 फेब्रुवारी प्रवासभाड्यात कुठलीही वाढ न करून सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देणार्‍या रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी यांनी महिलांचीही विशेष काळजी घेतली आहे. मातृभूमी नावाने लेडीज स्पेशल ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा ममतांनी बजेट सादर करताना केली. रेल्वेत 81 हजार महिला कर्मचारी आहेत. त्यांचा विचार करून 50 शहरांमध्ये रेल्वे पाळणाघरे सुरू करणार आहे. तसेच रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेसाठी महिलांकडून कुठलीही फी आकारण्यात येणार नाही. महिला प्रवाशांच्या सुरक्षेवरही ममतांनी विशेष भर दिला आहे. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला वाहिनी नावाच्या 12 बटालिटन तैनात करण्याची घोषणा ममता यांनी केली आहे. याशिवाय आरोग्य सुविधांसाठी 71 मल्टीफंक्शनल आरोग्य केंद्रे, 381 निदान केंद्रे यांचाही महिलांना फायदा होणार आहे. याशिवाय ममतांनी रेल्वे स्टेशन्सवर आधुनिक स्वच्छतागृहे उभारण्याची घोषणाही महिलांना दिलासा देणारी आहे.

close