बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली

January 8, 2016 11:46 AM0 commentsViews:

Bulluck race1

08 जानेवारी : ग्रामीण भागात अत्यंत लोकप्रिय असलेल्या बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

शेतकरी बैलांची काळजी घेतात. त्यांना प्रेमाने सांभाळतात. शर्यतीसाठी धावणार्‍या बैलांची तर विशेष काळजी घेतली जाते. तरीही शर्यतींदरम्यान बैलांना उत्तेजन देण्यासाठी, जोरात धावण्यासाठी जाणीवपूर्वक हाल केले जातात. त्यांचा अमानूष छळ करण्यात येतात या कारणांनी प्राणीमित्र संघटनांनी या शर्यतींना विरोध करण्यात आला होता.

त्याच्या आधारावर काँग्रेस आघाडी सरकारनं बैलगाडा शर्यतीवर बंदी घातली होती. या बंदीमुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी होती. बंदी उठवावी म्हणून काही ठिकाणी शेतकर्‍यांनी आंदोलनं केली होती. ग्रामीण भागतील या पारंपारिक लोकप्रिय खेळावरील बंदी उठवावी अशी शेतकर्‍यांची मागणी होती.

या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी पाठपुरावा केला होता. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर विचार चालू होता. केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना दामवे यांनी शिष्टमंडळासह भेटून यासंदर्भात मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य करत बैलगाडी शर्यतीवरील बंदी आज उठविली.

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close