पठाणकोट हल्ला : पाकिस्तानातूनच येत होते दहशतवाद्यांना फोन कॉल

January 8, 2016 1:20 PM0 commentsViews:

Air force Pathankot

08 जानेवारी : पठाणकोट हल्ल्यातले दहशतवादी हे पाकिस्तानीच होते याचे आणखी पुरावे समोर आले आहेत. पठाणकोट इथल्या एअरबेसवर हल्ला करणारे दहशतवादी +92 3000597212 आणि 92 3017775253 हे मोबाइल नंबर वापरणार्‍यांच्या संपर्कात होते. तपास पथकाला मिळालेले हे मोबाईल नंबर पाकिस्तानमधलेच आहेत. ‘एनआयए’ला मिळालेल्या या भक्कम पुराव्यांमुळे दहशतवादी पाकिस्तानमधील त्यांच्या ‘उस्तादा’च्या (म्होरक्या) संपर्कात राहून एअरबेसवरील हल्ल्याची योजना अमलात आणत होते, या शक्यतेला आणखी बळकटी मिळाली आहे.

दहशतवाद्यांनी टॅक्सी ड्रायव्हरची हत्या केली आणि त्याच्या फोनचा वापर करून पाकिस्तानात फोन केले. दहशतवाद्यांनी +92 3000597212 या नंबरवर 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजून 12 मिनिटांनी पहिल्यांदा मिस्ड कॉल दिला होता. दहशतवाद्यांनी या नंबरवरून एकदा पाकिस्तानात फोन केला होता, तर दोन वेळा अतिरेक्यांचा फोन आला होता. भारतात घुसखोरी केल्यानंतर दहशतवादी सतत ‘उस्ताद’च्या संपर्कात होते. ते पाकमध्ये बसलेल्या व्यक्तीला ‘उस्ताद’ असं म्हणत होतं आणि त्याच्याकडून योजनेच्या अमलबजावणीसाठी सतत मार्गदर्शन घेत होते. टॅक्सी ड्रायव्हरची हत्या करण्याचा आदेशही त्यांनीच दिला असही या फोन कॉल्सवरून स्पष्ट झालं आहे. रॉ आणि आयबी याचा तपास करत असून पाकिस्तान संबंधाचे ठोस पुरावे तयार करत असल्याची माहितीही सुत्रांनी दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close