आता हेलिकॉप्टरमधून करा मुंबई दर्शन

January 8, 2016 3:10 PM0 commentsViews:

08 जानेवारी : मुंबईकर आणि देशभरातून  मुंबई दर्शनाला येणार्‍या पर्यटकांसाठी एक खुषखबर आहे. आता हेलीकॉप्टरमधूनही त्यांना मुंबई बघता येणार आहे. एमटीडीसी आणि पवन हंस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं ही संधी पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. कालपासून ही सेवा सुरू झाली आहे. सहा प्रवासी क्षमता असणार्‍या हेलिकॉप्टरच्या एका राईडसाठी 3200 तिकिट असणार आहे. एक राईड ही 10 मिनीटांची असेल. पर्यंटकांना आपल्या सोबत कोणतंही सामान घेऊन जायला परवानगी नाहीये. मुंबईचे सर्व लॅन्डमार्क पाहण्याची व्यवस्था या राईडमध्ये करण्यात आलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close