दिघ्यात अंबिका सोसायटीवर हातोडा पडणार, सरकारची घोषणा फसवी

January 8, 2016 6:03 PM0 commentsViews:

digha_navimumbai08 जानेवारी : नवी मुंबईत दिघ्यातील धोकादायक इमारतीला चौपट दंड आकारून इमारती नियमित करण्याची राज्य सरकारची घोषणा फसवी ठरलीये. हायकोर्टात राज्य सरकारने बाजूच न मांडल्यामुळे गणपतीपाडा इथली अंबिका सोसायटीवर हातोडा पडणार आहे.

दिघ्यातील 92 अनधिकृत इमारतीवर हातोडा पाडण्याचे हायकोर्टाने आदेश दिले. कोर्टाच्या आदेशानंतर कारवाईही सुरू झाली. दिघ्यातील सर्वसामान्यांचा आक्रोश पाहता राज्य सरकारने अखेरीस हस्तक्षेप केला. ज्या धोकादायक इमारती आहे. त्यांना चौपट दंड आकारून नियमित केल्या जातील अशी घोषणा गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी केली. पण या घोषणेतून हायकोर्टाने आज हवाच काढून घेतलीये. दिघा अनधिकृत प्रकरणावर आज हायकोर्टात सुनावणी झाली. एकूण 9 इमारती पाडण्याबाबत आज न्यायालयात सुनावणी झाली. यात 6 इमारती पाडण्यास स्थगिती दिली आहे तर 2 इमारती पाडण्याबाबतचा आदेश जैसे थे ठेवण्यात आलाय. दिघ्यातील उर्वरित प्रकरणांची सुनावणी सोमवारी 11 जानेवारीला होणार आहे. न्या.ओक आणि न्या. भडंग यांच्यासमोर ही सुनावणी झाली. चौपट दंड आकारून बांधकामं नियमित करण्याची राज्य सरकारची घोषणा फसवी असल्याचं स्पष्ट झालंय. कारण याबाबत सरकारकडून न्यायालयात भूमिका मांडली गेली नाही. राज्य सरकारने भूमिका न मांडल्यामुळे अंबिका सोसायटीवर आता हातोडा पडणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close