साहित्यिकांनी इतरत्र भटकू नये, ‘पानिपत’कारांचा टोला

January 8, 2016 7:10 PM0 commentsViews:

vishawash_patil_sabanis08 जानेवारी : साहित्यिकांनी साहित्य क्षेत्राची चाकरी सोडून बाहेर फारसं भटकू नये असा टोला पानिपतकार विश्वास पाटील यांनी श्रीपाल सबनीस यांना लगावलाय. तसंच अध्यक्षपदासाठी सबनीसांसारखा अभिजात गृहस्थ कुठे सापडला ते माधवी वैद्य यांनाच विचारा,असा टोलाही पाटील यांनी लगावला.

आगामी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यामुळे चांगलेच चर्चेत आहे. सबनीस यांच्या अशा वागण्याचा पानिपतकार विश्वास पाटील यांनी समाचार घेतला. साहित्यिकांनी साहित्य क्षेत्राची चाकरी सोडून बाहेर फारसं भटकू नये. कारण ,प्रत्येक क्षेत्रात एक अधिकारी असतो. त्याने त्याचं काम पाहण्याची जबाबदारी त्याची असते. इतर बाहेरच्या व्यक्तीने त्यावर फारसं बोलू नये असा टोला पाटील यांनी लगावला. तसंच साहित्य क्षेत्रात विषारी वारं वाहतंय, ते नष्ट केलं पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर इतका अभिजात गृहस्थ साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून कुठून आणला. ते माधवी वैद्य यांनाच विचारा,असा टोलाही त्यांनी श्रीपाल सबनीस यांच्यावरुन लगावलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close