अशी असते आदिवासी आश्रमशाळा ; गणवेश तर दूरच विद्यार्थी करता आठवड्यात एकदाच आंघोळ !

January 8, 2016 8:16 PM0 commentsViews:

08 जानेवारी : आदिवासी आश्रमशाळेतील मुलांसाठी करोडोंचा निधी दरवर्षी सरकार खर्च करतं. पण या आश्रमशाळेत शिकणार्‍या मुलांना खरोखरच याचा लाभ होतो का ? तब्बल 2100 रुपयांचा वुलन स्वेटर विद्यार्थ्यांना देण्याचं कंत्राट अंतिम टप्प्यात आहे. अशा प्रकारच्या कंत्राटातील खरेदी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते का ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. म्हणून आम्हीही थेट आश्रमशाळेत जाण्याचा निर्णय घेतला.

ashram_schoolजर करोडोंचा निधी विद्यार्थ्यांसाठी खर्च केला जातोय तर आश्रमशाळेतील मुलं नक्कीच आरामात राहात असतील असा विचार कोणीही करेल. आम्ही गाठली थेट शेनवडची आश्रमशाळा. कारण याच शाळेला पायलट अर्थात मॉडेल आश्रमशाळेचा दर्जा आहे. पण आम्हाला दिसलेलं चित्र पार धक्काकदायक होतं. मध्यरात्रीला या आश्रमशाळेच्या आवारात आम्ही प्रवेश केला आणि बंद असलेल्या खोल्यांना भेट दिली. आणि एका झोपण्याच्या खोलीबाहेर अभ्यास करीत असलेला शाळकरी मुलगा आम्हास दिसला.

आश्रमशाळेतील परिस्थितीवर

-    कडाक्याच्या थंडीत कुडकुडत झोपलेले विद्यार्थी
-    खिडक्यांना दारं, गज नाही, खोलीची दारं तुटलेली
-    खोल्यांमधील कपाटं, पेट्या जीर्ण अवस्थेत
-    सर्व खोल्यांमधे लाईटचा फक्त एकच बल्ब
-    शौचालय नसल्यानं शौचास जावं लागतं उघड्यावर
-    4 वर्षांपासून विद्यार्थ्यांना रेनकोट किंवा स्वेटर नाही
-    विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षांपासून गणवेषही नाही
-    पाणी नसल्यानं 8 दिवसांनी एकदाच करतात आंघोळ
-    गरम पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही
-    जेवणासाठी दिलेल्या ताटांना पडलीत भोकं
-    जेवणासाठी रोज मैद्याच्या थंड पोळ्या

काय आहे नेमका हा घोटाळा ?

- रेनकोट खरेदीचा प्रस्ताव असताना स्वेटर खरेदीचा निर्णय
 – 2013 : 350 रुपये किंमतीचा स्वेटर, यावर्षी 2100 रुपयाला
- अवघ्या 2 वर्षात स्वेटरच्या किंमतीत पाचपट वाढ
- लोकरीच्या स्वेटर्सच्या दर्जाची तपासणी झाली का?
- ठेकेदार आणि अधिकार्‍यांचं याप्रकरणात संगनमत
 – पात्र आणि अपात्र निवीदाधारक एकाच कुंटुबातले
- पावसाळा गेला, पण विद्यार्थ्यांना रेनकोट नाहीच
- खरेदी प्रक्रियेत आदिवासी आयुक्तांची भूमिका काय?

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close