सीरिज घातली खिशात

February 24, 2010 5:27 PM0 commentsViews: 1

24 फेब्रुवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलेल्या रेकॉर्डब्रेक 200 रन्सच्या जोरावर भारताने ग्वाल्हेर वन डेत दक्षिण आफ्रिकेचा 153 रन्सने पराभव केला. या विजयासोबतच भारताने तीन वन डें मॅचची सीरिजही 2-0 अशी जिंकली आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या भारताने 3 विकेट गमावत 401 रन्स केले. यात सचिन तेंडुलकरचा वाटा होता तब्बल 200 रन्सचा. वन डे क्रिकेटमध्ये सचिनने सर्वाधिक रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड केला. याआधी सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड झिम्बाव्बेच्या चार्ल्स कॉव्हेंट्रीच्या नावावर होता. त्याने बांगलादेशविरुध्द नॉटआऊट 194 रन्स केले होते. पण हा रेकॉर्ड मोडत सचिनने नवा रेकॉर्ड रचला. सचिनसोबतच दिनेश कार्तिकने 79 तर कॅप्टन महेंद्रसिंग धोणीने 68 रन्स केले. या बलाढ्य टार्गेटचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची टीम 248 रन्समध्ये गडगडली.

close