137 वर्षांत एकदाच दुरुस्त झालेला हँकॉक ब्रीज होणार जमीनदोस्त

January 8, 2016 9:06 PM0 commentsViews:

hancock_bridge08 जानेवारी : उद्या मुंबईचा हँकॉक ब्रीज त्याच्या पुनर्बांधकामानिमित्त पाडण्यात येणार आहे. या ब्रीजच्या नुतनीकरणामुळे मध्ये रेल्वेवर तब्बल 18 तास मेगा ब्लॉक होणार आहे. परंतु 137 वर्ष जुन्या असलेल्या या ब्रीजचा इतिहास रंजक आहे.

भायखळा आणि सँडहर्स्ट रोडच्यामध्ये हा ब्रीज आहे. 1879 साली ब्रिटिशांनी बांधलेल्या या ब्रीजला हेरिटेज वास्तु म्हटलं तर त्यात नवल वाटण्यासारखं काहीच नाही. दगड आणि लोखंडापासून बांधलेला या ब्रीजने तब्बल 137 वर्ष जशाच तसा उभा आहे. या ब्रीजच्या दुरुस्तीचं काम एकदाच ते ही 1923 साली करण्यात आलं होतं. या ब्रीजच्या नावामागेही एक रंजक कथा आहे. कर्नल एचएफ हँकॉक यांच्या नावावरून या ब्रीजचं नामकरण करण्यात आलं होतं. एचएफ हँकॉक हे आधी महानगरपालिकेचे सदस्य होते तर 1877-1878 दरम्यान ते अध्यक्ष होते. या ब्रीजवर आपल्याला एक लहानशा दगडात कोरलेला शिलालेख वाचायला मिळतो ज्यात स्पष्ट लिहिलंय 1879- हँकॉक ब्रीज- पुनर्बांधणी 1923.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close