वन डे बादशहा!

February 24, 2010 5:34 PM0 commentsViews: 36

24 फेब्रुवारीमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं वन डे क्रिकेटमध्ये आणखी एक रेकॉर्ड रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या दुसर्‍या वन डेत सचिनने नॉटआऊट 200 रन्सची खेळी केली आहे. वन डेतील सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड त्याने केला आहे. अशी कामगिरी करणारा जगातला तो एकमेव बॅट्समन ठरला आहे. अवघ्या 146 बॉलमध्ये त्याने हा रेकॉर्ड केला.याआधी वन डेत सर्वाधिर रन्सचा रेकॉर्ड झिम्बाव्बेच्या चार्ल्स कॉव्हेंट्रीच्या नावावर होता. कॉव्हेंट्रीनं नॉटआऊट 194 रन्स केले होते. तर पाकिस्तानच्या सईद अन्वरच्या नावावरही 194 रन्स जमा होते. पण तो आऊट झाला होता. सचिनने हे सर्व रेकॉर्ड आता मागे टाकलेत… याआधी त्याने 46वी वन डे सेंच्युरी पूर्ण केली. 442 वन डेत त्याने ही कामगिरी केलीय. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स, सर्वाधिक सेंच्युरीचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर जमा होताच. पण आता वन डे क्रिकेटमध्ये हायेस्ट स्कोअरचा रेकॉर्डही त्याच्या नावावर जमा झाला आहे. सचिन आता सेंच्युरीची सेंच्युरी कधी करतो, याची आपण सगळे फॅन्स वाट बघत आहोत.

close