गेल्या वर्षभरात 160 पोलिसांचा मृत्यू, 7 जणांची आत्महत्या

January 8, 2016 11:09 PM0 commentsViews:

mumbai_police08 जानेवारी : ऑन ड्युटी चोवीस तास सेवा बजावणारे पोलीस मात्र आरोग्याच्या समस्येनं ग्रासले आहे. एवढंच नाहीतर कित्येक
पोलिसांची प्रकृती खालवल्यामुळे मृत्यू ओढावलाय. 2015 साली 160 पेक्षा जास्त पोलिसांचा मुंबईत मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे 7 पोलिसांनी आत्महत्या केलीये.

मुंबई पोलिसांवर असलेला सततचा ताण, खाण्यापिण्याचे हाल आणि वेळी अवेळी लागणारी ड्युटी या सगळ्याचा परिणाम पोलिसांच्या तब्येतीवर होताना दिसतोय. त्यांच्या मृत्यू मागे कर्करोग, ह्रदयविकार, प्रदीर्घ आजार, काविळ आणि यकृताचे आजार हीच मुख्य कारणं आहेत. टीबी, मलेरिया आणि दमा यामुळेही काही पोलिसांचा मृत्यू मागील वर्षात झाला आहे. दीर्घ आजारामुळे मागील वर्षी 36
पोलिसांचा मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे ह्रदयविकाराच्या धक्क्यामुळे 35 पोलिसांचा मृत्यू झालाय. कर्करोगामुळे 16 जणांचा मृत्यू झालाय. याहून धक्कादायक म्हणजे 7 पोलिसांनी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली आहे.

पोलिसांच्या मृत्यूमागची प्रमुख कारणं

- दीर्घ आजार – 36
– ह्रदयविकार – 35
– कर्करोग – 16
– काविळ – 15
– रस्ते अपघात – 17
– आत्महत्या – 7

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close