दारू प्यायली असेल तर गाडी सुरूच होणार नाही, लातूरकर कन्यांचा भन्नाट प्रयोग

January 8, 2016 11:16 PM0 commentsViews:

08 जानेवारी : लातूरच्या कॉक्सिट महाविद्यालयातील 2 विद्यार्थिनींनी एक भन्नाट प्रयोग केला आहे. त्यांनी दुचाकी आणि कारसाठी अशी कीट तयार केली आहे की जी गाडीत लावताच मोठ्या प्रमाणात अपघात टळणार आहे. जर गाडी चालवणारा दारू प्यायला असाल तर गाडी सुरूच होणार नाही. त्यामुळे ड्रंक ऍण्ड ड्राईव्हमुळे होणार्‍या अपघाताला आळा बसेल अशी या विद्यार्थिनींना आशा आहे. प्रियंका यादव आणि तृप्ती देगावकर अशी त्यांची नावं आहेत. ही कीट जर गाडीत बसवल्यास अल्कोहोलचा थोडाही वास आला की गाडी सुरू होत नाही. ड्रंक ऍण्ड डाईव्हसाठी पोलीस ज्या कीटचा वापर करतात त्याचा अभ्यास प्रियंका आणि तृप्तीनं केला. त्याचाच वापर करून या कीटचा प्रयोग केला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close