फिल्म रिव्ह्यु : अपेक्षित परिणाम न साधणारा ‘वजीर’

January 8, 2016 11:43 PM0 commentsViews:

अमोल परचुरे, समीक्षक

वजीर या सिनेमाचे प्रेामो बघितल्यापासून, फरहान आणि अमिताभची जोडी बघून सिनेमाबद्दल अपेक्षा निर्माण झाल्याच होत्या. सिनेमाचा रिलीज थोडा लांबला, पण तरीही उत्सुकता टिकवून ठेवण्यात सिनेमा यशस्वी ठरला, त्यात ‘शैतान’ आणि ‘डेव्हिड’ सारख्या सिेनमा बनवणारा बिजॉय नांबियार सिनेमाचा दिग्दर्शक आहे म्हटल्यावर तर उत्सुकता आणखी वाढली होती. सिनेमाची सुरुवात झाल्यावरच वेगळेपण दिसायला लागलं.

काय आहे स्टोरी ?

wazir-movie-posterसिनेमाची सुरुवातच होते ती गाण्याने… दानिश म्हणजे फरहान अख्तर आणि रुहाना म्हणजे आदिती राव-हैदरी यांचं लग्न ठरतं, लग्न होतं, मुलगी होते, सुखी संसार सुरू असतो हे सगळं दोन-तीन मिनिटांच्या गाण्यात दिसतं. बरं, बर्‍याच घटना या एका गाण्यात घडत असल्या तरी सगळं शूट स्लो-मोशनमध्ये… प्रयोगशील दिग्दर्शक आणखी काय काय दाखवतोय याचा विचार करत आपण सावरुन बसतो. सिनेमा झरझर पुढे सरकणार याची चाहूल लागलेली असतेच, त्यामुळे सिनेमा आपण लक्षपूर्वक बघायला लागतो. इंटरव्हलपर्यंत बर्‍याच गोष्टी घडतात, वेगाने घटना घडत असल्यामुळे आपल्याला फारशी उसंत मिळत नाही, पण इंटरव्हलमध्ये विचार सुरू होतो, आपण जे काही पाहिलं त्याला काही लॉजिक होतं का?, इंटरव्हलनंतर वेग कमी होतो आणि काहीतरी भन्नाट सस्पेन्स असेल हा अंदाजही चुकलेला असतो.

नवीन काय ?

विधु विनोद चोप्रा आणि टीमने बरीच वर्षं या कथेवर काम केलं होतं. स्क्रीप्ट अनेकदा बदलण्यात आली होती, ‘3 इडियट्स’, ‘मुन्नाभाई’, ‘पीके’ लिहीणार्‍या अभिजात जोशीने याचं लेखन केलंय. एवढा विचार होऊनही कथेमध्ये अनोखं असं फारसं काही नाहीये. मांडणीमध्ये नावीन्य नक्कीच आहे, पण बॉलीवूडचा हा बदललेला चेहरा आपण ‘बेबी’, ‘बदलापूर’सारख्या सिनेमांमध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे उत्कृष्ट अभिनयाचं प्यादं पुढे करत बिजॉय नांबियार आपली कथा पुढे सरकवत जातो.

wazir_2 एखादा ग्रँडमास्टर जेव्हा बुद्धीबळ खेळत असतो, तेव्हा त्याच्या चालींकडे आपण लक्ष ठेवून असतो, जरी त्याचा खेळ नेहमीसारखा वाटत असला तरी तो काहीतरी भन्नाट चाल खेळून प्रतिस्पर्ध्यावर मात करेल अशी आपली अपेक्षा असते. पण तो ग्रँडमास्टर आपली निराशा करतो. अगदी असंच या वजीरबद्दल घडतं. बिजॉय नांबियार, विधू विनोद चोप्रा, अभिजात जोशी या एवढ्या दिग्गज मंडळींनी जी कलाकृती तयार केलीये त्यात काहीतरी भन्नाट असणार आहे, जबरदस्त वळणं असतील, क्लायमॅक्सपर्यंत सस्पेन्स ताणलेला असेल असं वाटत राहतं, पण क्लायमॅक्सच्या बरंच आधी पुढे काय होणार याचा अंदाज आलेला असतो आणि तिथेच सगळा प्रॉब्लेम होतो.

परफॉर्मन्स

wazir_1वजीरचा सर्वात स्ट्राँग पॉईंट आहे, अभिनय… अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर यांनी तर लाजवाब काम केलेलंच आहे. लाजवाबपेक्षा पॉवरफुल म्हणावं लागेल. विशेष करुन फरहानचा खास उल्लेख करावा लागेल. संपूर्ण सिनेमात त्याने व्यक्तिरेखेचा ग्राफ कायम ठेवलेला आहे..

रेटिंग 100 पैकी 75

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close